जायकवाडीसाठी येवल्याचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:54 IST2018-10-21T00:53:27+5:302018-10-21T00:54:03+5:30
येवला : दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून येवला तालुक्याला वगळल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी येवला दुष्काळग्रस्त ...

तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदन देताना प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.
येवला : दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून येवला तालुक्याला वगळल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी येवला दुष्काळग्रस्त नसल्याचा जावई शोध सरकारने लावला असून, यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप प्रहार शेतकरी संघटनेने केला आहे. येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदार रोहीदास वारुळे यांना निवेदन दिले आहे.
येवला तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती असून राजापूर, अंदरसूल, नगरसूल या महसूल मंंडलातील संपूर्ण खरीप वाया गेला आहे. कित्येक गावांत पेरण्या झालेल्या नाहीत. जिथे पेरण्या झालेल्या आहेत, तिथे काही उगवलेच नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या सर्वच निकषात पात्र असताना केवळ नागपूरमध्ये बसून काही अधिकाºयांनी व राजकीय लोकांनी येवला तालुक्यात दुष्काळ नसल्याचा अहवाल तयार केला आहे.
संघटनेने महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीच्या माहितीवर गावातील दुष्काळी निकष ठरविण्याच्या प्रक्रि येचा तीव्र निषेध केला आहे. महसूल व कृषी विभागाच्या पाहणीवर तसेच गावोगावची स्थानिक पर्जन्यमान स्थिती, साठवण तलावातील पाणी, पाझर तलावातील सध्याचा साठा, भूजल पातळी आदी निकषांवर दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशीही या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, वसंतराव झांबरे, भागीनाथ गायकवाड, भाऊसाहेब कदम, हितेश दाभाडे, किरण दाभाडे, रावसाहेब आहेर, नवनाथ लभडे, भागतवराव सोनवणे आदींच्या स्वाक्षºया आहेत.