खड्ड्याने घेतला सिडकोतील युवकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 00:56 IST2021-12-27T00:53:57+5:302021-12-27T00:56:28+5:30
अंबड-लिंकरोडवरील एका हॉटेलमध्ये खोली बघण्यासाठी जाताना पहिल्या मजल्यावरून एका युवकाचा खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

खड्ड्याने घेतला सिडकोतील युवकाचा बळी
नाशिक : अंबड-लिंकरोडवरील एका हॉटेलमध्ये खोली बघण्यासाठी जाताना पहिल्या मजल्यावरून एका युवकाचा खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबड लिंक रोड येथील हॉटेल एक्सलन्सी येथे शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विनोद सुकदेव गीते (३०, रा. मोतीचौक सावतानगर ) हा त्याच्या नातेवाइकांसाठी आगाऊ आरक्षित केलेली खोली बघण्यासाठी गेला होता. यावेळी पहिल्या मजल्यावर हॉटेलचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने खाली मोठा खड्डा खोदलेला होता. या खड्ड्याचा विनोद सुकदेव गीते याला अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला. तोल गेल्यानंतर तो खड्ड्यात कोसळला. या दुर्घटनेत त्यास गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. विनोदच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. मोरवाडी स्मशानभूमीत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास अंबड पोलिसांकडून केला जात आहे.
---
--