दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुलीवर वाहने सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:39 IST2018-07-12T00:39:05+5:302018-07-12T00:39:22+5:30
दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुली ही दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन अपघात होतात़ चौफुलीवरील झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढरे पट्टे अस्पष्ट झालेले असून, रात्रीच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ या ठिकाणचे बहुतांशी अपघात हे वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने झालेले असून, या वेगमर्यादेला ‘ब्रेक’ची आवश्यकता आहे़

दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुलीवर वाहने सुसाट
नाशिक : दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुली ही दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन अपघात होतात़ चौफुलीवरील झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढरे पट्टे अस्पष्ट झालेले असून, रात्रीच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ या ठिकाणचे बहुतांशी अपघात हे वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने झालेले असून, या वेगमर्यादेला ‘ब्रेक’ची आवश्यकता आहे़ दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुलीवर अमृतधाम चौफुलीकडून येणारे, दिंडोरीरोड, मार्केट यार्ड तसेच नाशिककडून म्हसरूळ, दिंडोरी रोडकडे वाहने जातात़ या ठिकाणी महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली असली तरी वाहनधारक सिग्नल सुटेपर्यंत प्रतीक्षादेखील करीत नाही़ या चौफुलीवर वाहतूक पोलीस हे केवळ दंडवसुलीसाठी नियुक्त केले आहेत की काय, असे चित्र असते़ त्यामुळे या ़ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी तसेच मुंबई-आग्रा रोडवर एकाच ठिकाणी टाकलेले पाच-सहा एकत्रित गतिरोधक बसवावे जेणेकरून प्रत्येक वाहनधारक या ठिकाणी वाहनाचा वेग कमी करेल व अपघातांची संख्या कमी होईल़
तारवालानगर चौफुलीवर पूर्वी वळणरोड लहान असल्याने लावण्यात आलेली सिग्नल यंत्रणा तसेच वृक्षावर वाहने आदळल्याच्या घटना घडलेल्या असून, अनेकांचे जीवही गेलेले आहेत़ रस्ता रुंदीकरण केल्यानंतर रात्रीच्या वेळी या चौफुलीवरून भरधाव वाहने धावत असल्यामुळे पादचारी व दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून चौफु ली पार करावी लागते़ या ठिकाणी सीसीटीव्ही बसविलेले आहे.
याद्वारे किमान कोणत्या वाहनधारकाची चूक आहे हे पोलिसांच्या लक्षात येते़ तारवाला चौफुलीवर स्थानिक नागरिकांनी गतिरोधकाची मागणी केली की महामार्ग असल्याचे कारण पुढे केले जाते. त्यामुळे आणखी किती जणांचा बळी गेल्यानंतर या ठिकाणी गतिरोधक टाकले जाणार? असा सवाल नागरिक करतात़ या चौफुलीबाबत उपाययोजना केली जात नसल्याने चौक असुरक्षित बनला आहे.