सटाणा-मालेगाव रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 17:52 IST2020-08-25T17:51:43+5:302020-08-25T17:52:35+5:30
ब्राह्मणगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने सटाणा-मालेगाव रस्त्यावर खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने त्वरित खड्डे बुजवावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

सटाणा-मालेगाव रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहनधारक त्रस्त
ब्राह्मणगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने सटाणा-मालेगाव रस्त्यावर खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने त्वरित खड्डे बुजवावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
परिसरात पावसाने दमदार हजेरी न लावता संततधार सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. राज्य महामार्ग असल्याने अनलॉकनंतर या मार्गावर अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खड्डे पडण्यास व असलेल्या खड्ड्यांचा आकार वाढण्यास मदत झाली आहे. दुचाकी चालकांना मात्र यातून मार्ग काढताना जिकिरीचे ठरत आहे. अपघात होण्याची भीती व्यक्त होत असून, ब्राह्मणगावजवळील खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.
सटाणा-मालेगाव रस्त्यावर ब्राह्मणगावजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनधारक. (२५ ब्राह्मणगाव)