ओझरटाऊनशिप : येथील जनशांती धामात जगदमाऊली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी निमित्त सुरू असलेला जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळा विविध उपक्र मांनी होत आहे. या प्रसंगी बाणेश्वरआश्रमात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वेदपाठ शाळेतील वैदिक विद्यार्थ्यांनी मुख्य देवता भगवान बाणेश्वर महादेवांचे वैदिक मंत्राद्वारे पूजन -अभिषेक याबरोबरच सामूहिक रु द्राष्टकमचा पाठ केला.गेल्या आठवड्याभरापासून सुरू आलेल्या मातोश्री म्हाळसामाता पुण्यतिथी सोहळ्याची सांगता शनिवार दि. ६ आॅक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मातोश्री म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी निमित्त ओझरच्या जनशांती धामात गेल्या आठवड्याभरापासून भरगच्च कार्यक्र म सुरू आहेत. याच कार्यक्र माच्या अंतर्गत आश्रमातील वेदपाठ शाळेतील विद्यार्थ्यांनीजनशांती धामातील मुख्य देवता भगवान बाणेश्वर महादेवास वैदिक मंत्राद्वारे विधीयुक्त पूजन -अभिषेक , याबरोबरच सामूहिक रु द्रष्टकम्चा पाठ केला.
विद्यार्थ्यांतर्फे वैदिक सामूहिक पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 18:21 IST