वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यात अधिक वाढ होत असल्याने, रस्त्यांची वाट लागली आहे. Þदिंडोरी तालुक्यातील जालखेड ते जोरणपाडा तसेच जोरणपाडा ते नळवाडपाडा रस्त्याकडे कोणत्याच लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यांस मुहूर्त लागेनासा झाला असल्याच्या प्रतिक्रि या येथील परिसरातील नागरिक व शेतकरीवर्ग दर्शवित आहे. ननाशी, ठेपणपाडा, जोरण, साद्राळे, श्रीरामनगर, जालखेड आदी भागातून वाहनधारकांची मोठी रेलचेल असून, रस्त्यांचा पूर्णपणे खुळखुळा झाल्याने रस्त्यावरील दगड आजूबाजूला पसरून वाहन चालविताना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी या रस्त्यांबाबत लक्ष देऊन त्वरित रस्ता दुरु स्ती करून वाहनधारकांचा व शेतकरीवर्गाचा टांगणीला आलेला जीव वाचवावा, अशी मागणी होत आहे. तीन-चार वर्षांपासून नळवाडपाडापासून जोरणपाडा, ठेपणपाडा व जालखेड रस्ता पूर्णपणे खराब अवस्थेत असून, या रस्त्यांकडे कोणत्याच लोकप्रतिनिधीचे लक्ष नसून यास ३ ते ४ वर्ष उलटून गेले आहे; मात्र रस्ता जैसे थे असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे रस्ते वाहनधारक व शेतकºयांचा मुख्य रस्ता असून, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती होणे अपेक्षित आहे. खडी, दगड रस्त्याच्या शोभेसाठीच फक्त आणून पडल्याने ठेपणपाडा ते नळवाडपाडा येथील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असल्याने रस्ता दुरु स्ती करणे गरजेचे असूनही या रस्त्यावर नुसते खडी व दगड याचे ढीग केले; मात्र रस्त्याची दुरुस्ती का होत नाही या प्रश्नाने येणारे-जाणारे वाहनधारक मोठ्या विवंचनेत सापडले आहे. या रस्त्याहून वाहन अपघात होणे नित्याचे झाले आहे पण सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार हा सवाल नागरिकांना पडला आहे.
वरखेडा : वाहनचालकांची दैना; नागरिकांमध्ये संताप जोरणपाडा-ठेपणपाडा रस्त्याचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:05 IST
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यात अधिक वाढ होत असल्याने, रस्त्यांची वाट लागली आहे. Þदिंडोरी तालुक्यातील जालखेड ते जोरणपाडा तसेच जोरणपाडा ते नळवाडपाडा रस्त्याकडे कोणत्याच लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
वरखेडा : वाहनचालकांची दैना; नागरिकांमध्ये संताप जोरणपाडा-ठेपणपाडा रस्त्याचा बोजवारा
ठळक मुद्देरस्त्यांस मुहूर्त लागेनासातत्काळ दुरुस्ती होणे अपेक्षित