कोकणगाव च्या छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक दिन साजरा विविध आॅनलाईन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 16:48 IST2020-09-06T16:46:48+5:302020-09-06T16:48:34+5:30

कोकणगाव : (तालुका निफाड) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक मधुकर पवार व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.

Various online competitions to celebrate Teacher's Day at Chhatrapati Shivaji Vidyalaya, Konkangaon | कोकणगाव च्या छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक दिन साजरा विविध आॅनलाईन स्पर्धा

कोकणगाव च्या छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक दिन साजरा विविध आॅनलाईन स्पर्धा

ठळक मुद्देनिबंध, वक्तृत्व व शिक्षकांना शुभेच्छा देणारी ग्रीटिंग कार्ड आॅनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या.

कोकणगाव : (तालुका निफाड) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक मधुकर पवार व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मधुकर पवार, उपशिक्षक अनिल सूर्यवंशी, लक्ष्मण पडोळ, गीतांजली जाधव, शिवाजी जाधव, साहेबराव पवार आदी उपस्थित होते. विज्ञान गीतांजली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनानिमित्त निबंध, वक्तृत्व व शिक्षकांना शुभेच्छा देणारी ग्रीटिंग कार्ड आॅनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेत संकल्प शिंगाडे, सलोनी गरु ड, गायत्री सरोदे, आदित्य सरोदे, प्रशांत गायकवाड, नंदन क्षीरसागर, प्रणाली मोरे, पारमी पगारे, तेजस गायकवाड, प्रणाली मोरे, ऋ षिकेश शिंगाडे, हर्षद गांगुर्डे, संचेती सरोदे, ऋ षिकेश वाबळे, करण गांगुर्डे या विद्यार्थ्यांनी आॅनलाईन स्पर्धेत सहभाग घेतला.

Web Title: Various online competitions to celebrate Teacher's Day at Chhatrapati Shivaji Vidyalaya, Konkangaon