शहरात घरफोडीसह चोरीच्या विविध घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:43 AM2018-09-22T00:43:30+5:302018-09-22T00:43:47+5:30

शहरात घरफोडीच्या तसेच चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, चोरट्यांनी गाडीमधून ६० हजारांची रोकड तसेच पेठरोडवर एका बंगल्यातून महागड्या साड्या, लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे़

 Various incidences of burglary with the burglary in the city | शहरात घरफोडीसह चोरीच्या विविध घटना

शहरात घरफोडीसह चोरीच्या विविध घटना

Next

नाशिक : शहरात घरफोडीच्या तसेच चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, चोरट्यांनी गाडीमधून ६० हजारांची रोकड तसेच पेठरोडवर एका बंगल्यातून महागड्या साड्या, लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़  मालेगाव स्टॅण्डवरील पालिजा पेट्रोलपंपावरील पंक्चरच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या गाडीमधून चोरट्यांनी ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी येथील संदीप जाधव यांनी
पेट्रोलपंपावरील पंक्चरच्या दुकानासमोर गाडी उभी केली होती़ चोरट्यांनी या गाडीतील काळ्या रंगाच्या रेक्झिनच्या बॅगेतून ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  टेलरिंग दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना पेठरोड परिसरात घडली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी काळे (दुर्गानगर, पेठरोड) यांचे पेठरोडवर रेणुका लेडीज वेअर अ‍ॅण्ड टेलरिंगचे दुकान आहे़ १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला़ तसेच दुकानातील १५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, २६ हजार रुपयांच्या महागड्या साड्या असा ४१  हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी म्हसरूळ पोलीस  ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आरटीओ कार्यालयाजवळील अश्वमेघनगरमधील रहिवासी सचिन चौले यांचा महागडा मोबाइल चोरट्यांनी आकाश पेट्रोलपंपाच्या मागे असलेल्या जगदंबा मोबाइल शॉपीतून चोरून नेल्याची घटना घडली़ या प्रकरणी  म्हसरूळ पोलीस ठाण्यात  चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Various incidences of burglary with the burglary in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.