ब्राह्मणगाव परिसरात पक्ष्यांसाठी विविध फळझाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 17:49 IST2019-05-16T17:49:01+5:302019-05-16T17:49:22+5:30
एकीकडे सर्वत्र चिमणी व अन्य प्रकारच्या पक्षांची संख्या कमी होत असताना येथील निसर्गप्रेमी पदवीधर शेतकरी प्रकाश कौतिक अहिरे यांनी आपल्या शेतातील रहात्या बंगल्याजवळ अनेक प्रकारची फुले, फळ झाडे लावून पक्ष्यांसाठी पाणी व खाण्यासाठी धान्याची व्यवस्था केली आहे. त्यांचे शेतात आज शेकडोच्या संख्येने चिमणी, कावळे, साळुंकी व अन्य पक्षी दररोज येतात .

ब्राह्मणगाव परिसरात पक्ष्यांसाठी विविध फळझाडे
ब्राह्मणगाव : एकीकडे सर्वत्र चिमणी व अन्य प्रकारच्या पक्षांची संख्या कमी होत असताना येथील निसर्गप्रेमी पदवीधर शेतकरी प्रकाश कौतिक अहिरे यांनी आपल्या शेतातील रहात्या बंगल्याजवळ अनेक प्रकारची फुले, फळ झाडे लावून पक्ष्यांसाठी पाणी व खाण्यासाठी धान्याची व्यवस्था केली आहे. त्यांचे शेतात आज शेकडोच्या संख्येने चिमणी, कावळे, साळुंकी व अन्य पक्षी दररोज येतात .
आजूबाजूला झाडांची संख्या खूप असल्याने वातावरणात गारवा राहत असल्याने सर्व पक्षी दाणे खाऊन, पाणी पिऊन आनंदाने दिवसभर किलिबलाट करत खेळत राहतात..
श्री. अहिरे यांना विविध प्रकारची झाडे लावण्याची आवड आहे. तसेच गिर्यारोहणची ही आवड आहे. निसर्गाशी जवळीक असल्याने त्यांना पशूपक्षांची आवड आहे. त्यांनी पक्ष्यांसाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तसेच ते पक्षांसाठी दररोज दाणे टाकतात. पक्षांसोबत त्यांचेकडे मांजर, पाळीव कुत्रा असून पक्षांचे रोजचे येणे खेळणे पाहून मांजरे व श्वानही पक्षांसोबत आनंदाने दिवसभर सावलीत खेळतात. सर्वत्र कडक ऊन, तापमान ४० च्या पार गेले असताना येथे मात्र झाडांची दाट गर्दी असल्याने सुखद गारव्यामुळे पक्षांची किलबिल मनाला सुखद आनंद देऊन जाते.