नाशिकरोड परिमंडळातील विविध तक्रारी निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:30 IST2018-11-25T23:11:47+5:302018-11-26T00:30:40+5:30

नाशिक पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ दोनमधील सहा पोलीस ठाण्यांमधील ९६ तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले.

 Various complaints received from the Nashik Road Region | नाशिकरोड परिमंडळातील विविध तक्रारी निकाली

नाशिकरोड परिमंडळातील विविध तक्रारी निकाली

नाशिकरोड : नाशिक पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ दोनमधील सहा पोलीस ठाण्यांमधील ९६ तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले. नाशिकरोड पोलीस ठाण्यातील सभागृहात तक्रार निवारण दिन व मोटार वाहन निर्गती मेळावा झाला. पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, शांताराम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, प्रभाकर रायते, नारायण न्याहाळदे, राजेंद्र कुटे, विलास जाधव, लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, अंबड, सातपूर या सहाही पोलीस ठाण्यांतील एकूण ९६ तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले. तसेच विविध गुन्ह्यांत जप्त असलेल्या २० मोटारसायकली संबंधिताना देण्यात आल्या.

Web Title:  Various complaints received from the Nashik Road Region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.