वारीस पठाण यांचा भाजपतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:51 IST2020-02-23T23:19:08+5:302020-02-24T00:51:21+5:30

एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारीस पठाण यांनी देशातील एकतेला बाधा उत्पन्न करणाऱ्या वक्तव्याचा येवला भाजयुमोच्या वतीने निषेध करण्यात आला.

Varias Pathan protests by BJP | वारीस पठाण यांचा भाजपतर्फे निषेध

वारीस पठाण यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा येवला भाजयुमोच्या वतीने निषेध करण्यात आला.

येवला : एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारीस पठाण यांनी देशातील एकतेला बाधा उत्पन्न करणाऱ्या वक्तव्याचा येवला भाजयुमोच्या वतीने निषेध करण्यात आला.
येथील येवला-विंचूर चौफुलीवर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच माजी आमदार पठाण यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलनही करण्यात आले. भाजप नेते आनंद शिंदे, भाजयुमो जिल्हा चिटणीस मयूर मेघराज यांनी समयोचित भाषणे केली. तसेच युवा नेते सचिन दराडे, ज्येष्ठ नेते सुधाकर पाटोळे, धनंजय कुलकर्णी, गोरख खैरनार, येवला तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे यांनी निषेध नोंदविला. यावेळी संतोष केंद्रे, विशाल भांडगे, आदर्श बाकळे, संतोष काटे आदी उपस्थित होते.

Web Title: Varias Pathan protests by BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.