शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

नाशिकमध्ये ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा, पाणी पातळीत होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 8:45 AM

नाशिक विभागीय आयुक्त यांच्या आदेशान्वये श्रमदान वनराई बंधारा उपक्रमाला कळवण तालुक्यातील धार्डे दिगर शिवारापासून सुरु वात करण्यात आली.

मनोज देवरे/कळवण (नाशिक) - नाशिक विभागीय आयुक्त यांच्या आदेशान्वये श्रमदान वनराई बंधारा उपक्रमाला कळवण तालुक्यातील धार्डे दिगर शिवारापासून सुरु वात करण्यात आली. तालुक्यातील वनराई बंधारे उपक्रमाला धार्डे दिगर ग्रामपंचायतमधील बरड पाडा ताकबारी धरणातील नाल्यावर ४० फूट रुंद मातीनाला वनराई बंधारा बांधण्यात आला.

नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने गाव परिसरात किमान 5 वनराई बंधा-याची बांधणी श्रमदानातून करायची आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, बचत गट, स्वयंसेवी संस्था अशा विविध सामाजिक घटकांचा व लोकसहभाग महत्त्वाचा समावेश करून गाव परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल, यासाठी प्रयत्न करावयाचे असल्याचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी सांगितले आहे.

कळवण तालुक्यातील वनराई बंधारे उपक्र माला धार्डे दिगर बरडपाडा येथे जिल्हा परिषद सदस्या जयश्री पवार, नितीन पवार, उपसभापती विजय शिरसाठ, गटविकास अधिकारी बिहरम यांच्या समवेत सरपंच ललिता जाधव, कनिष्ठ अभियंता के.आर.चव्हाण, उपसरपंच काशिनाथ बिहरम , ग्रामसेवक एस.वाय.महाले आदीसह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते . लोकसहभाग, लोकप्रतिनिधी व अधिकारी अथक प्रयत्नातून सुमारे ४० फूट रुंद मातीनाला वनराई बंधारा बांधण्यात आला. कळवण तालुक्यातील सर्व गावात दरवर्षी लोकसहभागातून जलसंधारणासारख्या कामाला हातभार लावत आहे, हे उल्लेखनीय आहे . धार्डे दिगर परिसरातील ग्रामस्थांनी वनराई बंधारे बांधण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. - जयश्री पवार , जि.प. सदस्य , धार्डे दिगर गट कळवण तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान पाचवनराई बंधारे बांधण्यासाठी सुचित केले आहे. दरवर्षी सर्व विभागाकडून अनेक वनराई बंधारे बांधले जातात. या बंधा-यांमुळे अनेक हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. याचा फायदा शेतक-यांना व प्राण्यांना होणार आहे. - डी.एम.बहिरम , गटविकास अधिकारी  

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका