वागदर्डी धरण भरून वाहू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 01:10 AM2019-10-10T01:10:17+5:302019-10-10T01:10:32+5:30

मनमाड : गेल्या अनेक वर्षांत पाणीटंंचाईने कळस गाठल्याने हवालदिल झालेल्या मनमाडकरांना नुकत्याच झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवडाभरात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. २०१६ सालानंतर वागदर्डी धरण प्रथमच भरल्याने मनमाडकरांची यावर्षी पाणीटंचाईतून मुक्तता झाली आहे.

Vagardi Dam started flowing | वागदर्डी धरण भरून वाहू लागले

वागदर्डी धरण भरून वाहू लागले

googlenewsNext
ठळक मुद्देसुकाळ : पाणीटंचाईतून मनमाडकरांची मुक्तता

मनमाड : गेल्या अनेक वर्षांत पाणीटंंचाईने कळस गाठल्याने हवालदिल झालेल्या मनमाडकरांना नुकत्याच झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवडाभरात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. २०१६ सालानंतर वागदर्डी धरण प्रथमच भरल्याने मनमाडकरांची यावर्षी पाणीटंचाईतून मुक्तता झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांत वाढत्या पाणीटंचाईमुळे पाणीपुरवठ्याच्या दिवसात सातत्याने वाढ होत गेली. यावर्षी शहराला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जलसंकटानंतर यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस होत असला तरी मनमाड परिसर मात्र याला अपवाद होता. मधूनच अल्पशा येणाºया पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळत असले तरी भूगर्भातील पाणी पातळीत सुधारणा होत नव्हती. गेल्या आठवडाभरापासून झालेल्या समाधानकारक पावसाने वागदर्डी धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यातून आज पाणी बाहेर निघाले. याबरोबरच शहरासाठी तयार करण्यात आलेला पाटोदा साठवणूक तलाव पूर्ण भरला असून, या उपलब्ध पाण्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईने होरपळलेल्या मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठ्याच्या दिवसात कपात होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आॅक्टोबर २०१६ मध्ये हे धरण भरले होते. त्यानंतर सततच्या दुष्काळामुळे वागदर्डी धरण दरवर्षी रिकामे राहत होते.
यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांच्या खरिपाबरोबरच रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहे.गेल्या अनेक वर्षांपासून रिकामे असलेले मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये कपात करण्याबाबतची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून सुरू आहे.
-पद्माावती धात्रक,
नगराध्यक्ष, मनमाड न.पा.

Web Title: Vagardi Dam started flowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.