पिंपळगाव आरोग्य केंद्रात लस उपलब्ध ; नागरिकांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 11:24 IST2018-04-12T01:38:00+5:302018-04-12T11:24:09+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात विविध लस उपलब्ध झाल्या असून, मातांची विविध लसींच्या डोससाठीची वणवण थांबली आहे. दि. ७ एप्रिल रोजी लोकमतमध्ये ‘आरोग्य केंद्रात लसींची कमतरता’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची जिल्हा आरोग्य यंत्रणेने गांभीर्याने दखल घेत लस उपलब्ध करून दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

पिंपळगाव आरोग्य केंद्रात लस उपलब्ध ; नागरिकांमध्ये समाधान
पिंपळगाव बसवंत : येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात विविध लस उपलब्ध झाल्या असून, मातांची विविध लसींच्या डोससाठीची वणवण थांबली आहे. दि. ७ एप्रिल रोजी लोकमतमध्ये ‘आरोग्य केंद्रात लसींची कमतरता’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची जिल्हा आरोग्य यंत्रणेने गांभीर्याने दखल घेत लस उपलब्ध करून दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या पाच महिन्यांपासून टीपीटी, बुस्टर, गोवर आदी लसींचा तुटवटा होता. यामुळे अनेक मातांना लस न मिळाल्याने परतावे लागत, खासगी रुग्णालयात जादा पैसे मोजावे लागत होते. गेल्या पाच महिन्यात अवघे २५० लसीकरण झाले आहेत. आरोग्यकेंद्रांतर्गत दहा गावांचा समावेश असून, महिन्याला तीनशे ते चारशे लसींची आवश्यकता असताना, केवळ ५० औषधींचा पुरवठा होत होता. उत्पादन पुणे येथून होत असल्यामुळे शासनाचा अपुरा पाठपुरावा व नियोजन नसल्याने सर्वसामान्यांना चकरा माराव्या लागत होत्या. ही बाब लक्षात घेताच ग्रामपंचायत सदस्य बापू कडाळे, सतीश मोरे, अश्विन गागरे यांनी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाघचौरे यांची भेट घेऊन परिस्थिती समजून सांगितली व तत्काळ डोस उपलब्ध करून दिले. यापुढे पिंपळगावच्या आरोग्य केंद्राच्या बाबतीतील समस्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन वाघचौरे यांनी दिली.पिंपळगाव बसवंत आरोग्यकेंद्रात पाच महिन्यांपासून लसींची कमतरता होती. याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून लस उपलब्ध करून दिल्याने दिलासा मिळाला आहे.
- डॉ. चेतन काळे,
आरोग्य अधिकारी