डोस संपल्याने शहरातील लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 10:31 PM2021-03-18T22:31:17+5:302021-03-19T01:26:47+5:30

नाशिक- शहरातील नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा उत्साह असला तरी प्रत्यक्षात मात्र अपुऱ्या पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. अपुऱ्या लस ...

Vaccination in the city stalled as the dose ran out | डोस संपल्याने शहरातील लसीकरण ठप्प

डोस संपल्याने शहरातील लसीकरण ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिक डोस न घेताच परत : आज सायंकाळपर्यंत पुरवठा होणार




नाशिक- शहरातील नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा उत्साह असला तरी प्रत्यक्षात मात्र अपुऱ्या पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे बहुतांश ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि व्याधिग्रस्त नागरिकांना केंद्रांवरून परत जावे लागले. नाशिक शहरातील बिटको आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय वगळता अन्य बहुतांश केंद्रे बंद ठेवावी लागली. दरम्यान, कोविशिल्डचे दीड लाख डोस मागवण्यात आले असून, त्यातील काही डोस शुक्रवारी (दि.१९) प्राप्त होतील. त्यामुळे शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटीच्या दिवशीही लसीकरण पुन्हा सुरू होऊ शकेल, असे सांगण्यात आले.

१६ जानेवारीपासून कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड अशा दोन लसी सर्वप्रथम शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यावेळी काहींनी रिॲक्शनच्या भीतीने नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फ्रंट वर्कर्स म्हणजेच पोलीस आणि अन्य महापालिका, नगरपालिका कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले तर, तिसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त परंतु ज्यांना हृदयरोग, रक्तदाब, मूत्रपिंड विकार आहेत अशांनाच नोंदणी करून लस देण्यात येत आहे. सुरुवातीला अनेकांना लसीविषयी शंका असली तरी आता मात्र कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता सर्वच नागरिक लस घेण्यास उत्सुक असताना दुुसरीकडे मात्र गेल्या तीन ते चार दिवसापासून लस संपल्याचे कारण सांगून ज्येष्ठ नागरिकांना परत पाठविले जात आहे. गुरुवारी(दि.१८)देखील लस संपल्याचे सांगून अनेकांना परत माघारी फिरावे लागले.
यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी कोविशिल्डच्या लस संपल्याचे सांगून दीड लाख लस यापूर्वीच मागविल्याचे स्पष्ट केले. मात्र, यातील काही डोस शुक्रवारी (दि.१९) येणार असून, ते वितरित करण्यास संपूर्ण दिवस जाणार असल्याने शनिवारी (दि. २१) लसीकरण करता येऊ शकेल, असे सांगितले.

कोव्हॅक्सिन लस
आणखी २४ खासगी रुग्णालयात लसीकरण
नाशिक शहरात लसीकरणासाठी सुमारे ३६ केंद्रे आहेत. यात महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. परंतु लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणखी २४ खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यास मान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका


एकीकडे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी पुरेशा प्रमाणात डोस उपलब्ध असल्याचे सांगतात आणि दुसरीकडे मात्र सातपूर परिसरात तिन्ही केंद्रांवर डोस नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना पायपीट करत परत जावे लागले असे होऊ नये, यासाठी महापालिकेने पुरेसा साठा सर्वच केंद्रांवर करण्याचे नियोजन करावे.
- प्रा. वर्षा भालेराव, नगरसेविका, भाजप

Web Title: Vaccination in the city stalled as the dose ran out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.