शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बस तिकीट आरक्षणासाठी वापरा 'यूपीआय'; प्रवाशांना मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:07 IST

आरक्षण खिडकीवर डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नसल्यामुळे प्रवाशांना रोख मिळवण्यासाठी एटीएम सेंटरचे हेलपाटे मारावे लागत होते.

नाशिक : मेळा बसस्थानकातील आरक्षण खिडकीवर यूपीआय अथवा तत्सम डिजिटल प्रणालीद्वारे आगाऊ तिकीट आरक्षित करण्याची सुविधा नसल्याचे वृत्त 'लोकमत'ने मंगळवारी (दि. ११) प्रसिद्ध केले होते. त्यामुळे महामंडळाने तातडीने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आरक्षण खिडकीवर डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नसल्यामुळे प्रवाशांना रोख मिळवण्यासाठी एटीएम सेंटरचे हेलपाटे मारावे लागत होते.

बऱ्याचदा परगावाहून आलेल्या प्रवाशांना एटीएमच्या शोधात भटकंती करण्याची वेळ येत होती. तसेच, रोख पैसे असले तरी तिकीट आरक्षित करताना सुट्या पैशांची चणचण भासल्यामुळे, खिडकीवरील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये खटके उडत होते. यामुळे आरक्षण खिडकीवर यूपीआय आणि तत्सम डिजीटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. महामंडळाने ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे एसटी प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना तिकीट आरक्षित करणे सोयीचे होणार आहे. प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. आरक्षण खिडकीवर यूपीआय आणि कार्डद्वारे पेमेंट करण्याची सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षित करणे सोयीचे होईल.- संजय मोहिते, स्थानकप्रमुख, मेळास्थानक

तो फलकही हटलाआरक्षण खिडकीवर यूपीआय पेमेंट होत नाही, अशा आशयाचा बोर्ड लावण्यात होता. 'लोकमत'च्या बातमीनंतर महामंडळाने तेथे यूपीआय आणि कार्डद्वारे पेमेंटची सुविधा करून दिली. त्यानंतर महामंडळाने तो फलकही हटवला आहे.

टॅग्स :state transportएसटीNashikनाशिक