शासकीय कामासाठी सोशल माध्यमाचा वापर ग्राह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 20:52 IST2020-06-09T20:51:47+5:302020-06-09T20:52:14+5:30

या संदर्भात दोन दिवसांपुर्वी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढून सर्व शासकीय कार्यालयांना अवगत केले आहे.

Use of social media for government work is acceptable | शासकीय कामासाठी सोशल माध्यमाचा वापर ग्राह्य

शासकीय कामासाठी सोशल माध्यमाचा वापर ग्राह्य

ठळक मुद्दे ई-मेल, व्हॉटस्अपचा वापर करून केलेले शासकीय काम ग्राह्य

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असुनही शासनाने हळू हळू संचारबंदी व लॉकडाऊनमध्ये बऱ्या प्रमाणात शिथीलता दिली असल्याने त्यामुळे जनजीवन सुरूळीत होण्याबरोबरच शासकीय कार्यालयांमध्येही अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढली आहे. तथापि, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी व अधिकाºयांची संख्या नियंत्रीत करण्याचा शासनाचा विचार सुरू असून, त्यामुळे शासकीय काम करताना अधिकारी व कर्मचा-यांनी ई-मेल, व्हॉटस्अप या सोशल माध्यमाचा वापर करून केलेले शासकीय कामकाज ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या संदर्भात दोन दिवसांपुर्वी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढून सर्व शासकीय कार्यालयांना अवगत केले आहे. त्यात नमुद केले आहे की कोरोना विषाणूंचा प्रसार राज्य शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी व कर्मचाºयांना त्याचा संसर्ग होवू नये म्हणून शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असून, त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयातील कर्मचाºयाची उपस्थिती नियंत्रीत करण्यात येत आहे. भविष्यातही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता शासकीय अधिकारी व कर्मचाºयांनी त्यांच्या घरातच राहूनही कार्यालयीन आवश्यकतेनुसार व तातडीनुसार शासकीय कामकाजाचा निपटारा करण्यासाठी शासकीय ईमेल तसेच त्यांचा नेहमीच्या वापरातील अन्य ईमेल तसेच व्हॉटस् अपचा वापर शासकीय कामाकाजासाठी तसेच संबंधितांना सुचना, आदेश देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचा-यांनी त्यांचे शासकीय व खासगी ईमेल आयडी, एस.एम.एस., व्हॉटस्अपची सुविधा असलेला मोबाईल क्रमांक कार्यालय प्रमुखास देण्यात यावा. प्रशाासकीय कामकाजासाठी ईमेल, व्हॉटस् अपचा वापर जास्तीत जास्त करून शासकीय कामाचा निपटारा करावा अशा सुचना दिल्या आहेत.

Web Title: Use of social media for government work is acceptable