सोशल मीडियाचा योग्य वापर करा :  रवींद्रकुमार सिंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:41 AM2018-03-22T00:41:33+5:302018-03-22T00:41:33+5:30

सोशल मीडियाचा योग्य प्रमाणात वापर करावा. एका मर्यादेनंतर प्रत्येकाने स्वत:ला बंधने घातली तर साशल मीडियामुळे होणारे वैयक्तिक परिणाम तर कमी होतीलच पण गुन्हेगारीही कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी केले.

Use proper social media: Ravindra Kumar Single | सोशल मीडियाचा योग्य वापर करा :  रवींद्रकुमार सिंगल

सोशल मीडियाचा योग्य वापर करा :  रवींद्रकुमार सिंगल

googlenewsNext

नाशिक : सोशल मीडियाचा योग्य प्रमाणात वापर करावा. एका मर्यादेनंतर प्रत्येकाने स्वत:ला बंधने घातली तर साशल मीडियामुळे होणारे वैयक्तिक परिणाम तर कमी होतीलच पण गुन्हेगारीही कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅन्ड रिसर्च महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी नाशिक शहरातील विविध विभागांच्या वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल सादर केल्याबद्दल त्यांना यावेळी सिंगल यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. धनेश कलाल यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे नाशिक विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, सहखजिनदार प्रा. बी. देवराज, प्रा. आर. पी. देशपांडे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, डॉ. दीप्ती देशपांडे, शैलेश गोसावी तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी आभार मानले. स्नेहा रत्नपारखी व मुग्धा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Use proper social media: Ravindra Kumar Single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.