शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

दलित वस्ती निधीचा वापर अन्य प्रभागांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:42 AM

महापालिकेने मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेल्या ५ टक्के निधीचा वापर दलितवस्ती सुधारणेवर करण्याऐवजी ज्याठिकाणी मागासवर्गीय वसाहती नाहीत, अशा प्रभागांवर केला असून, त्यात बव्हंशी भाजपा नगरसेवकांच्या प्रभागत निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. दलितवस्ती सुधारणा निधीच्या खर्चाबाबतचे आॅडिट करण्याची मागणीही शिवसेनेने केली आहे.

नाशिक : महापालिकेने मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेल्या ५ टक्के निधीचा वापर दलितवस्ती सुधारणेवर करण्याऐवजी ज्याठिकाणी मागासवर्गीय वसाहती नाहीत, अशा प्रभागांवर केला असून, त्यात बव्हंशी भाजपा नगरसेवकांच्या प्रभागत निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. दलितवस्ती सुधारणा निधीच्या खर्चाबाबतचे आॅडिट करण्याची मागणीही शिवसेनेने केली आहे.विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दिवे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दलितवस्तीवर महापालिकेने गेल्या तीन वर्षांत केलेल्या खर्चाचा तपशीलच पुराव्यानिशी सादर केला. यावेळी प्रशांत दिवे यांनी सांगितले, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता दलित वस्ती सुधारणा निधी म्हणून १३ कोटी २४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली, तर आतापर्यंत २४ कोटी २ लाख रुपयांची प्राकलने वेगवेगळ्या स्तरावर कार्यवाहीत आहेत. १४ कोटी ९६ लाखांच्या शिल्लक निविदा असून, या वर्षात आतापर्यंत ८७ लाख ६३ हजार रुपयांची देयके अदा होऊ शकली आहेत. दलित वस्ती सुधारणेवर अंदाजपत्रकापेक्षा २६ कोटी ६१ लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत या निधीअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांचा तपशील पाहता, मागासवर्गीय वसाहती या निधीपासून वंचित ठेवण्यात आल्या आहेत, तर ज्याठिकाणी मागासवर्गीय वसाहती अथवा लोकसंख्या नाही तेथे कोट्यवधी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.  प्रभाग १७ हा मागासवर्गीयांची लोकसंख्या असलेला सर्वांत मोठा प्रभाग आहे. परंतु, याठिकाणी एकही काम प्रस्तावित नाही. याउलट या निधीतून पेठरोड ते पेठनाका कॅनालपावेतो ३ कोटी १५ लाख रुपये खर्चाचा डांबरी रस्ता प्रस्तावित केलेला आहे. प्रभाग ४ मधील तारवालानगर, सहकारनगर याठिकाणी पथदीप, तर श्रीरामनगर येथील उद्यानात समाजमंदिर प्रस्तावित केलेले आहे. लामखेडेमळा येथील मोकळ्या भूखंडावर अभ्यासिका, लोकसहकारनगरमध्ये ६० लाखांचे काम, तर प्रभाग २ मधील मराठानगरमध्ये २४ लाखांचे मलवाहिका टाकण्याचे प्रस्तावित केलेले आहे. महापौरांच्या प्रभाग १ मधील केतकी सोसायटी परिसरातही ७७ लाख रुपये खर्चाची अभ्यासिका प्रस्तावित आहे. कामांच्या यादीचे अवलोकन केले असता भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांवर दलित वस्तीच्या निधीची खैरात करण्यात आलेली आहे. दलित वस्ती सुधारणा निधी अन्य प्रभागांसाठी वापरण्यात येत असून, या साºया प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही प्रशांत दिवे यांनी केली आहे. सदर प्रकरण आपण धसास लावणार असून, प्रसंगी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचीही तयारी असल्याचे दिवे यांनी स्पष्ट केले. काय आहे शासन परिपत्रक शासनाच्या नगरविकास विभागाने ३ जुलै १९८२ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, दलित वस्ती सुधारणा निधी कोठे आणि कोणत्या कामांसाठी वापरला पाहिजे, याविषयी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार, पाणीपुरवठा, मलनिस्सारण सुधारणा, उद्याने, बगिचे, धर्मशाळा, सार्वजनिक सभागृह, मनोरंजनासाठी साधने, कर्मचाºयांसाठी छोटी घरकुल योजना, शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, रस्ते बांधणी, वैद्यकीय सुविधा या कामांवर भर देणे आवश्यक असते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक