वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी इमारती विनावापर पडून

By Admin | Updated: January 20, 2016 22:19 IST2016-01-20T22:18:09+5:302016-01-20T22:19:34+5:30

छगन भुजबळ यांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन

Use of buildings without the need for medical officers | वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी इमारती विनावापर पडून

वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी इमारती विनावापर पडून

येवला : प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची बांधकामे पूर्ण होऊन वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी नसल्याने या इमारती सध्या विनावापर पडून असून, कर्मचारीवर्ग व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली आहे.
अंदरसूल, कातरणी, अनकई, नगरसूल येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे मंजूर होऊन ही उपकेंदे्र
नवीन इमारतीत कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, भारम (ता. येवला) तसेच खिर्डीसाठे व भुलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे भारम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतही पूर्ण झाली
असून, कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक झाली नसल्याने या परिसरातील रुग्णांना आरोग्य केंद्र असूनही सुविधा मिळू शकत नाही.
यासंदर्भात आढावा बैठकीत आमदार भुजबळ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध मंजूर करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करून तीन महिने उलटूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. नवीन आकृतिबंध मंजूर नसल्यामुळे या सुसज्ज इमारती विनावापर पडून आहेत.
येवला शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रु ग्णालयात रूपांतर करून सुसज्ज आणि आधुनिक पद्धतीचे ग्रामीण रु ग्णालय सुरू आहे. येवल्यात ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास जून २०१४ मध्येच मान्यता देण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्याकरिता १० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकासह प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर केलेला आहे. याबाबतही लक्ष घालून प्रशासकीय मान्यता प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: Use of buildings without the need for medical officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.