सुवर्णकार समाजाचा वर-वधू मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:12 IST2019-05-19T00:01:59+5:302019-05-19T00:12:19+5:30

आम्ही सुवर्णकार मंडळातर्फे उपनगर येथे ६ जूनला सर्व जाती-धर्मीय वधू-वर, पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Upvarakarka Samaj's Up-bride rally | सुवर्णकार समाजाचा वर-वधू मेळावा

सुवर्णकार समाजाचा वर-वधू मेळावा

नाशिकरोड : आम्ही सुवर्णकार मंडळातर्फे उपनगर येथे ६ जूनला सर्व जाती-धर्मीय वधू-वर, पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आम्ही सुवर्णकार मंडळातर्फे सर्वजाती धर्मीय वधू-वर, पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळ्यासंदर्भात दत्तमंदिर सिग्नल वैथरा कॉम्प्लेक्स पहिल्या मजल्यावर संस्थेच्या कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहे. इच्छामणी लॉन्स येथे ६ जून रोजी होणाऱ्या वधू-वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळ्यास राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीपराव कांबळे, माजी मंत्री छगन भुजबळ, बबनराव घोलप, आमदार बाळासाहेब सानप, पोलिस आयुक्त विश्वासराव नांगरे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष मीनाताई सोनार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Web Title: Upvarakarka Samaj's Up-bride rally