मानोरी परिसरात अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:20 IST2021-02-18T20:52:47+5:302021-02-19T01:20:56+5:30
रब्बी हंगामातील लाल कांदा काढणीचे काम सर्वत्र सुरू असून काढणीला आलेला कांदा अवकाळी पावसात सापडल्याने कांद्याचे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात असून या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर कांदा पिकाला पावसाचा फटका बसला आहे. तसेच महिना भरापूर्वी अवकाळी पावसातुन सावरत असताना काल झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

मानोरी परिसरात अवकाळी पाऊस
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड फाटा, जळगाव नेउर आदी परिसरात गुरुवारी (दि.१८) ला संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वारे तर विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने सुमारे एक तास हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गाची एकच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.
रब्बी हंगामातील लाल कांदा काढणीचे काम सर्वत्र सुरू असून काढणीला आलेला कांदा अवकाळी पावसात सापडल्याने कांद्याचे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात असून या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर कांदा पिकाला पावसाचा फटका बसला आहे. तसेच महिना भरापूर्वी अवकाळी पावसातुन सावरत असताना काल झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
अनेक ठिकाणी द्राक्ष तोडणी काम सुरू असून चांगल्या प्रतीच्या द्राक्षांना केवळ २० ते २५ रुपये प्रति किलो दराने भाव मिळत असतानाच त्यात अवकाळी पावसामुळे हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
काढणीला आलेला गहू देखील अवकाळी पावसात सापडल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. परिणामी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.