शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

अशासनमान्य संघटना शासनाकडून बेदखल

By admin | Updated: January 9, 2017 01:45 IST

निर्णय : २६० संघटनांच्याच मागण्यांचा होणार विचार

नाशिक : राज्य सरकारने मान्यता दिलेल्या संंघटनांच्या व्यतिरिक्त अमान्य शासकीय संघटनांच्या मागण्या व निवेदनांचा यापुढे विचार न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, राज्यातील फक्त २६० संघटनांनीच केलेल्या मागण्यांचाच यापुढे विचार केला जाईल, असेही जाहीर करण्यात आले आहे.
यासंदर्भात शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, अनेक संघटना या श्रमिक अधिनियमाखाली, धर्मादाय आयुक्त यांच्या अंतर्गत नोंदणीकृत असून, तसे लेटर हेडवर छापून त्या शासन मान्य असल्याचे समजून शासनाकडे पत्रव्यवहार करीत असतात. अशा संघटनांची निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वा संघटनांकडून थेट शासनास प्राप्त होत असतात.
यासंदर्भात सन १९९१ व २०११ मध्येदेखील शासनाने अशासनमान्य संघटनांच्या निवेदनांची दखल घेऊ नये, असे ठरविण्यात आलेले असतानाही पुन्हा पुन्हा हे प्रकार घडू लागले असल्यामुळे शासनाने पुन्हा या संदर्भात आदेश काढून दखल न घेण्याचा पुनरुच्चार केला
आहे.
जिल्हाधिकारी कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये यांच्याकडे संघटनांची निवेदने प्राप्त झाल्यास त्या संघटनांच्या लेटरहेडवर शासन व मान्यता प्राप्त असल्याचा सामान्य प्रशासन विभागद्वारा निर्गमित शासन आदेशाचा क्रमांक व दिनांक स्पष्ट नमूद केल्याखेरीज त्यांच्या पत्रव्यवहाराची वा शिष्टमंडळाची दखलही घेऊ नये असे या आदेशात म्हटले असून, त्यासाठी राज्यातील शासनमान्य एकूण २६० संघटनांची यादीही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (प्रतिनिधी)