अवकाळी पावसाने द्राक्ष, कांद्यानंतर आता भाजीपाल्यांनाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2023 13:54 IST2023-05-12T13:54:18+5:302023-05-12T13:54:41+5:30
अवकाळी पावसाने द्राक्ष, कांद्यानंतर आता भाजीपालाल्या देखील फटका बसला असून फ्लॅावर पिकाला अक्षरशः सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोम फुटल्याने उभ ...

अवकाळी पावसाने द्राक्ष, कांद्यानंतर आता भाजीपाल्यांनाही फटका
अवकाळी पावसाने द्राक्ष, कांद्यानंतर आता भाजीपालाल्या देखील फटका बसला असून फ्लॅावर पिकाला अक्षरशः सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोम फुटल्याने उभ पिकं उपटून जनावरांपुढे टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
आता या अवकाळी पावसाचा फटका हळूहळू जाणवू लागला असून भाजीपाला पिकाला देखील या पावसाचा फटका बसला आहे. येवला तालुक्यातील नागडे गावातील शेतकऱ्याने फ्लॉवरचे पीक घेतले होते. मात्र पावसामुळे या फ्लॅावरच्या पिकाला कोंब फुटल्याने अक्षरशः फ्लॉवर कोणी विकत घेत नसल्याने केलेला उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने शेतातील उभे फ्लॅावर पीक उपटून जनावरांपुढे खायला टाकले. लक्ष्मीचे तरी पोट भरेल ह्या हेतूने फ्लॉवरचे पीक या शेतकऱ्याने नष्ट केले.