बिजोरसेच्या उपसरपंचपदी काकडे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:35 IST2019-12-19T18:35:09+5:302019-12-19T18:35:32+5:30
बागलाण तालुक्यातील बिजोरसेच्या उपसरपंचपदी योगेश काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जाधव, पी. टी. भगत, तलाठी आव्हाड यांनी केली.

बिजोरसेच्या उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर योगेश काकडे यांच्यासमवेत दिनकर मोरे, नितीन काकडे, झिला गायकवाड, कामिनी काकडे, सरला मोरे, उज्ज्वला मोरे, ताराबाई शेवाळे, अनिता गायकवाड आदी.
नामपूर : बागलाण तालुक्यातील बिजोरसेच्या उपसरपंचपदी योगेश काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जाधव, पी. टी. भगत, तलाठी आव्हाड यांनी केली. थेट सरपंचपदी संदीप मोरे यांची थेट निवडणूक झाल्याने उर्वरित सदस्यांमधून उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्व गावाचे लक्ष लागून होते. निवडून आलेले सदस्य योगेश काकडे, दिनकर मोरे, नितीन काकडे, झिला गायकवाड, कामिनी काकडे, सरला मोरे, उज्ज्वला मोरे, ताराबाई शेवाळे, अनिता गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते. बिनविरोध निवड करण्यासाठी बाळासाहेब मोरे, अभिमन मोरे, वसंत मोरे, शेखर मोरे, रावसाहेब काकडे, किशोर काकडे, दिनेश काकडे, सुरेश काकडे, नानाजी रौंदळ, प्रा. रवींद्र मोरे, शशिकांत काकडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.