अज्ञात वाहनाची धडक; पादचारी महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 20:04 IST2018-08-08T19:58:12+5:302018-08-08T20:04:27+5:30
जुना मुंबई-आग्रा महामार्गावर दरेगाव शिवारातील जनता सायझिंगजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी महिला जागीच ठार झाली.

अज्ञात वाहनाची धडक; पादचारी महिला ठार
मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पवारवाडी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली. फैमिदा एकबाल अहमद (४०) रा. फिरदोसगंज ही महिला रात्री बाहेरगावाहून आल्यावर रस्त्याने पायी जात असताना भरधाव वेगात जाणाºया अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. अधिक तपास पवारवाडी पोलीस करीत आहेत.