शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

हिरावाडीत अज्ञाताने पेटविली कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 1:12 AM

हिरावाडी परिसरात असलेल्या भगवतीनगर येथे सोमवारी (दि.२२) पहाटे दीड वाजेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी बंगल्याबाहेर उभी केलेली भाजीपाला व्यापाऱ्याची चारचाकी टाटा हेक्सा गाडी पेट्रोल ओतून जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे.

पंचवटी : हिरावाडी परिसरात असलेल्या भगवतीनगर येथे सोमवारी (दि.२२) पहाटे दीड वाजेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी बंगल्याबाहेर उभी केलेली भाजीपाला व्यापाऱ्याची चारचाकी टाटा हेक्सा गाडी पेट्रोल ओतून जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यवसाय करणारे दिलीप अंबरपुरे हिरावाडीत भगवतीनगरला राहात असून, रविवारी (दि.२१) रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे टाटा हेक्सा क्र मांक (एमएच १५, जीएफ ८०८९) गुरु कृपा बंगल्याबाहेर उभी केली होती. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पाऊस सुरू असताना काही समाजकंटकांनी टाटा हेक्सा कारवर पेट्रोल ओतून पेटवून दिली.काही वेळाने गाडीच्या काचा फुटल्याने जोराचा आवाज झाला व आजूबाजूला राहणारे नागरिक जागे झाले. गाडी जळाल्याचे समजतात अंबरपुरे यांनी बंगल्याबाहेर धाव  घेतली असता चारचाकी जळताना दिसली. त्यांनी सदर माहिती पोलिसांना कळविली व काही वेळाने घटनास्थळी पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पेटलेली टाटा हेक्सा चारचाकी विझविली. भरवस्तीत घडलेल्या चारचाकी जाळपोळीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.विशेष म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वी म्हसरूळ परिसरातील बोरगड येथील वाढणे कॉलनी भागात असलेल्या भास्कर सोसायटीत तीन दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती. तर यापूर्वीदेखील पंचवटीत गाड्या जाळणे, चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले होते. हिरावाडीत जाळलेल्या चारचाकी घटनेत परिसरात राहणाºया गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयितांचा हात असल्याची चर्चा सुरू असून, त्यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी