शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ‘कोविड सुरक्षाकवच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 17:31 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना उन्हाळी सत्रातील २०२० परीक्षेकरिता वास्तव्याच्या ठिकाणापासून जवळचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच कोविड - १९च्या पार्श्वभूमीवर संलग्नित महाविद्यालयांतील सर्व पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना ’कोविड सुरक्षाकवच योजना लागू करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व परीक्षा मंडळाने कोविड सुरक्षाकवच योजनेस मंजुरी दिल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली. 

ठळक मुद्देउपचारासाठी एक लाख रुपये परीक्षेकरिता जवळचे परीक्षाकेंद्र निवडण्याचा पर्याय

नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना उन्हाळी सत्रातील २०२० परीक्षेकरिता वास्तव्याच्या ठिकाणापासून जवळचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच कोविड - १९च्या पार्श्वभूमीवर संलग्नित महाविद्यालयांतील सर्व पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना ’कोविड सुरक्षाकवच योजना लागू करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व परीक्षा मंडळाने कोविड सुरक्षाकवच योजनेस मंजुरी दिल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.    कोविड-१९च्या आपत्कालीन परिस्थितीत विशेष बाब म्हणून विद्यार्थी त्यांच्या वास्तव्याच्या जवळचे, त्यांच्या अभ्यासक्र माचे महाविद्यालय हे परीक्षा केंद्र म्हणून निवडू शकणार आहेत. तसेच सद्यस्थितीत ते ज्या महाविद्यालयात प्रवेशित आहेत ते महाविद्यालयदेखील ते परीक्षा केंद्र म्हणून निवडू शकतात. ज्या परीक्षा केंद्राची ते निवड करतील तेथूनच त्यांना लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी हजर राहावे लागणार आहे. पदवीपूर्व सर्व अभ्यासक्र मांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना  कोविड-१९मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत, विद्यार्थ्यांनी लांबचा प्रवास करू नये या उद्देशाने त्यांनी त्यांच्या घराजवळच्या त्यांच्या विद्याशाखेच्या महाविद्यालयाचा परीक्षा केंद्र म्हणून पसंतीक्र म द्यावा, असे विद्यापीठातर्फे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत विद्यापीठास मंगळवार (दि.१४) पर्यंत निवडलेल्या पसंतीक्र म पाठवावा. यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाकडून कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर संलग्नित महाविद्यालयांतील सर्व पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना’ कोविड सुरक्षाकवच’ योजनेअंतर्गत, विद्यार्थी आजारी झाल्यास उपचारासाठी रु पये एक लाख व दुर्दैवी मृत्यू झाल्यास रु पये तीन लाख इतकी रक्कम प्रदान करण्यात येणार असल्याचेही डॉ. अजित पाठक सांगितले. दरम्यान, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना कोविड-१९ करिता शासनाने निर्देशित केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे तसेच आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. 

 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य