चापडगाव परिसरात कन्यारत्नाचे अनोखे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:55 PM2020-01-10T22:55:38+5:302020-01-11T01:03:48+5:30

चापडगाव येथील प्रगतिशील शेतकरी साईराज अ‍ॅग्रो एजन्सीचे संचालक शिरीष मल्हारी सांगळे यांनी कन्यारत्नाच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे.

The unique welcome to Kanya Ratna | चापडगाव परिसरात कन्यारत्नाचे अनोखे स्वागत

सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथे फुलांच्या पायघड्या घालून कन्यारत्नाचे स्वागत करताना सांगळे दांपत्य.

Next

सिन्नर : तालुक्यातील चापडगाव येथील प्रगतिशील शेतकरी साईराज अ‍ॅग्रो एजन्सीचे संचालक शिरीष मल्हारी सांगळे यांनी कन्यारत्नाच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे.
सांगळे हे शेतीसोबत व्यवसायही करतात. मुलगी आपल्या आयुष्यात नवा प्रकाश बनू शकते. मुलाप्रमाणे मुलीचेही स्वागत मोठ्या आशेने झाले पाहिजे. तिच्या पायाने लक्ष्मी घरात येते, या विचाराने मुलगी प्रथम घरात आल्यानंतर फुलांच्या पायघड्या घालून तिचे आनंदी वातावरणात औक्षण करण्यात आले. तिच्या जन्माचे स्वागत केक व जिलेबी वाटून करण्यात आले. लहान मुलांना भोजन देण्यात आले. ग्रामीण समाजात नवी दिशा देण्याचे काम सांगळे परिवाराने केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: The unique welcome to Kanya Ratna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.