शासनाच्या नावे रक्तदान करून अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:51 IST2020-05-26T18:50:50+5:302020-05-26T18:51:09+5:30
गळ्यात 'मी एनएचएम कंत्राटी कर्मचारी २००५ पासुन सेवेत असुनही शासनाने कायम केलेले नाही' असा फलक लावुन कामकाज

शासनाच्या नावे रक्तदान करून अनोखे आंदोलन
नाशिक : कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे या मागणीसाठी मंगळवारी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय आरोग्य मिशन कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने शासनाच्या नावे रक्तदान करून अनोखे आंदोलन केले.
कंत्राटी कर्मचारी व नियमित कर्मचारी यांनी आपल्या मागण्यांसाठी तिन टप्प्याचे आंदोलन हाती घेतले असुन, त्यात या सर्व कर्मचाऱ्यांनी
गळ्यात 'मी एनएचएम कंत्राटी कर्मचारी २००५ पासुन सेवेत असुनही शासनाने कायम केलेले नाही' असा फलक लावुन कामकाज करीत आहेत. या आंदोलनाचा दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतीसाद देवुन ठिक ठिकाणी रक्तदान करणे. त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयात या कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आंदोलन केले. शासनाने या आंदोलनाची दाखल न घेतल्यास 1 जून पासुन संरक्षणही सामग्री न वापरता कोरोना विरुद्ध लढाईत काम करन्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.