पेठ ग्रामीण रूग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी सर्वपक्षीय आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 18:01 IST2019-11-27T18:01:20+5:302019-11-27T18:01:53+5:30
पेठ : येथील ग्रामीण रूग्णालयात आदिवासी रु ग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत पेठ तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून आरोग्य सुविधांसह रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

पेठ ग्रामीण रूग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी सर्वपक्षीय आक्रमक
येथील ग्रापीण रु ग्णालयात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वैद्यकीय सेवेबाबत व रिक्त पदांबाबत तसेच १०८ रुग्णवाहिका आदी अनेक समस्यांविषयी बैठक घेण्यात आली. संबंधित बैठकीत रिक्त जागा न भरल्यास व इतर मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन लवकरच करण्यात येईल असा सर्वपक्षीय ठराव झाला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचातक श्याम गावित, नगराध्यक्ष मनोज घोंगे , उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, उपसभापती तुळशीराम वाघमारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल जाधव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष दामू राऊत, नगरसेवक संतोष डोमे, माजी सरपंच पुंडलिक महाले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जाकीर मनियार, पेठ शहर काँग्रेस अध्यक्ष याकुब शेख, मनसे शहराध्यक्ष गणेश वळवी, राजेश पाटील, विक्र म चौधरी, सुरेश पवार आदी उपस्थित होते.