गिरणा नदीपात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 06:16 PM2019-04-28T18:16:45+5:302019-04-28T18:17:49+5:30

कळवण तालुक्यातील जुनी बेज, भादवण, गांगवन गिरणा नदीवरील पुलाच्या खाली नदीपात्रात रविवारी सकाळी दहा वाजता अनोळखी इसमाचा (३५) मृतदेह तरंगताना आढळून आला.

Unidentified body in Girna river bed | गिरणा नदीपात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह

गिरणा नदीपात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह

Next

पिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज, भादवण, गांगवन गिरणा नदीवरील पुलाच्या खाली नदीपात्रात रविवारी सकाळी दहा वाजता अनोळखी इसमाचा (३५) मृतदेह तरंगताना आढळून आला. जुनी बेज येथील पोलीसपाटील अशोक लाडे यांनी कळवण पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली.
जुनी बेज, भादवण, गांगवन या गिरणा नदीवरील १५ ते २० फूट उंची असलेल्या पुलाखाली अनोळखी मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर कळवण पोलीस विभागाचे पीएआय अविनाश गडाख व बीट अंमलदार जे. डी. लवारे यांनी घटनास्थळी येऊन अनोळखी इसमाचा मृतदेह बाहेर काढला व पंचनामा केला असता सदर मृतदेह हा पुरु ष जातीचा असून, वय ३५ आहे.
परिसरातील नागरिकांना सदर अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी विचारणा केली असता अजूनपर्यंत या मृतदेहाची ओळखही पटू शकली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून, गांगवन पोलीसपाटील प्रमोद पाटील, भादवण पोलीस पाटील कैलास जाधव, जुनी बेज पोलीसपाटील अशोक लाडे यावेळी घटनास्थळी हजर होते. पुढील तपास कळवण पोलीस विभागाचे पीएआय अविनाश गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार जे. डी. लवारे, प्रमोद वाघ, संदीप कडाळे, कैलास घरटे करीत आहेत.

Web Title: Unidentified body in Girna river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.