शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘किसान पत्रकार’ नावाने बेरोजगारांना गंडा; राज्यात अनेक घटना

By admin | Updated: March 4, 2017 01:20 IST

नाशिक : भारत सरकारच्या दूरसंचार केंद्राच्या नावाचा वापर करीत, सरकारच्याच किसान चॅनलसाठी ‘किसान पत्रकार’ म्हणून नेमणूक करण्यासाठी राज्यातील बेरोजगारांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला

नाशिक : भारत सरकारच्या दूरसंचार केंद्राच्या नावाचा वापर करीत, सरकारच्याच किसान चॅनलसाठी ‘किसान पत्रकार’ म्हणून नेमणूक करण्यासाठी राज्यातील बेरोजगारांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला असून, नियुक्तीच्या नावाखाली संबंधितांकडून हजारो रुपयांची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे उमेदवारांच्या घरी नियुक्तिपत्र पाठवून पैशांची मागणी होत असल्याने त्यावर विश्वास ठेवणाऱ्या बेरोजगारांना गंडविण्याचा नवीन फंडा भामट्यांनी अवलंबिला आहे. नाशिक शहरातील काही बेरोजगार तरुणांना ‘किसान पत्रकार’ म्हणून नियुक्तीचे पत्रे थेट घरी पोहोचल्याने त्याची खात्री करण्याचा काहींनी प्रयत्न केला असता, त्यातून हा प्रकार लक्षात आला आहे. डी. डी. किसान चॅनलच्या लेटरहेडवर २०१६ ते २०५६ अशा तीस वर्षासाठी किसान पत्रकार म्हणून सरकारी नोकरी देण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. वर्षाकाठी तीन लाख, ९० हजार व महिन्याला ३२ हजार ५०० रुपये असे वेतनही ठरविण्यात आले असून, या पत्रावर संचालक सीमा शर्मा यांची स्वाक्षरी आहे. या नियुक्तिपत्रासोबतच किसान चॅनल विषयी माहिती देताना संपूर्ण देशात २४९२ पदे भरण्यात येणार असून, महाराष्ट्रात २२० पदे आहेत. त्यासाठी दहावी अथवा बारावी उत्तीर्ण असण्याची अट घालण्यात आली आहे. ज्या उमेदवारांची पत्रकार म्हणून निवड करण्यात आली, त्यांना नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी १३ हजार ७५० रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करणे बंधनकारक करण्यात आले असून, कोणत्याही परिस्थितीत डिमांड ड्राफ्ट अथवा धनादेशाने ही रक्कम घेतली जाणार नाही, तर फक्त बॅँक खात्यात रोख रक्कमच जमा करण्याची सक्ती केली आहे. नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे उमेदवार पैसे जमा करणार नाहीत, त्यांची नियुक्ती त्याच दिवशी रद्द केली जाणार असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. अनामत रक्कम जमा करण्यासाठी ०७८३८९७४९०५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)