ताहाराबादजवळ अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 23:34 IST2018-08-08T23:33:46+5:302018-08-08T23:34:31+5:30
ताहाराबाद-अंतापूर रस्त्यावरील वाकी नाल्यात अँपे रिक्षा आणि मोटार सायकल यांच्यात बुधवारी (दि.८) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन आदिवासी युवक जागीच ठार झाले तर रिक्षा चालक गंभीर जखमी झाला.

ताहाराबादजवळ अपघातात दोन ठार
अॅपे रिक्षा (क्र मांक एम. एच. ४१ एई ५०३३) आणि मोटार सायकल (क्र मांक एम.एच. ४१ जी १४८५) यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार देवीदास सुभाष सोनवणे (वय २२) आणि भाऊसाहेब श्रावण सोनवणे (वय ३२) हे जागीच ठार झाले तर अॅपे रिक्षा चालक विजय एकनाथ सासले (वय २३) हा गंभीर जखमी झाला. मयत झालेले दोघे युवक ताहाराबाद गावातुन वाकीनाल्या लगत असलेल्या रावेर आदिवासी वस्तीवरील आपल्या घरी परतत होते.