शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

तुकाराम मुंढेंच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाबाबत अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 6:50 PM

मुंढे जाणार रजेवर : प्रशासनाकडून मात्र तयारी सुरू

ठळक मुद्देजिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे शुक्रवारी (दि.२७) पदभार स्वीकारणार असल्याची चर्चामुंढे यांची दि. २ ते ११ मे या कालावधीसाठी रजा मंजूर झालेली असून ते युरोपला खासगी दौ-यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे

नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे पंधरा दिवसांसाठी रजेवर जाणार असल्याने येत्या शनिवारी (दि.२८) होणाऱ्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे शुक्रवारी (दि.२७) पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा सुरू असताना आयुक्त कार्यालयाकडून मात्र, वॉक विथ कमिशनर हा उपक्रम होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आयुक्तांच्या रजा कालावधीत होणा-या या उपक्रमाबाबत संभ्रमावस्था आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इंच न् इंच जमिनीवर कर लागू करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे तिव्र पडसाद उमटत आहेत. गेल्या सोमवारी (दि.२३) करवाढीविरोधात नाशिककरांसह शेतक-यांनी रस्त्यावर उतरत आपला रोष व्यक्त केला तर महापालिकेच्या विशेष महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी करवाढीला कडाडून विरोध दर्शविल्यानंतर महापौरांनी मुंढेंच्या निर्णयाला स्थगिती दिली. शहरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असतानाच तुकाराम मुंढे हे पंधरा दिवसांच्या रजेवर जाणार असल्याची बातमी आली. मुंढे यांची दि. २ ते ११ मे या कालावधीसाठी रजा मंजूर झालेली असून ते युरोपला खासगी दौ-यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेला चौथा शनिवार (दि.२८), रविवार (दि.२९), सोमवारी बुद्धपौर्णिमा (दि.३०) आणि मंगळवारी महाराष्ट दिन(दि.१ मे) अशी सलग चार दिवस सुट्टी आहे. त्यामुळे जिल्हाधिका-यांकडून शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी मुंढे यांच्याकडून पदभार स्वीकारला जाणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास, येत्या शनिवारी (दि.२८) गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम होणार किंवा नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. आयुक्त कार्यालयाकडून मात्र, उपक्रम होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, पदभार सुपुर्द केल्यानंतर रजा कालावधीत आयुक्तांना असा उपक्रम घेता येईल किंवा नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. मागील शनिवारी कौटुंबिक कारणास्तव आयुक्त मुंढे यांना सदरचा उपक्रम पुढे ढकलावा लागला होता. आता त्याची सुरुवात शनिवारी अपेक्षित असताना आयुक्त रजेवर जाणार असल्याने उपक्रमाचा मुहुर्त लागण्यास अडचण निर्माण झाली आहे.बंगल्यावर बंदुकधारी सुरक्षारक्षककरवाढीविरोधी शहरात तिव्र असंतोष प्रकट केला जात असतानाच आयुक्तांविरुद्धही रोष व्यक्त होत आहे. या साºया पार्श्वभूमीवर महापालिकेत महाराष्ट सुरक्षा मंडळाचे नियुक्त करण्यात आलेले शस्त्रधारी सुरक्षारक्षक आयुक्तांच्या शासकीय बंगल्यावर तैनात करण्यात आले आहेत. महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेले बंदुकधारी काढून घेत ते बंगल्यावर पाठविण्यात आले असून तीन सत्रात ७ बंदूकधारी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे