इगतपुरी रेल्वेस्थानकात दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:00 IST2019-07-14T22:56:32+5:302019-07-15T01:00:40+5:30
मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकाच्या फलाट क्र. १च्या बाजूला असलेल्या कचराकुंडीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, प्रवासी व येथे काम करणाऱ्या रेल्वे कर्मचारी व रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

इगतपुरी येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ च्या बाजूला असलेली कचराकुंडी.
इगतपुरी : मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकाच्या फलाट क्र. १च्या बाजूला असलेल्या कचराकुंडीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, प्रवासी व येथे काम करणाऱ्या रेल्वे कर्मचारी व रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पाऊस सुरू असल्याने या कचराकुंडीतील कचरा कुजत असून, सभोवताली दुर्गंधी पसरली आहे. सदरची कचराकुंडी घटविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
या कचराकुंडीत पावसाचे पाणी साठत असल्यामुळे कचरा कुजत आहे. येथे माश्यांची झुंड दिसून येत असल्याने साथी रोगांना आमंत्रण मिळत आहे. रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. १ च्या बाजूलाच ही कचराकुंडी असल्याने स्थानकात गाडी थांबली तर प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दररोज शेकडो मेल, एक्स्प्रेस प्रवास करतात. कसारा घाट सेक्शन असल्याने मुंबईकडे जाणाºया व नाशिककडे जाणाºया सर्व गाड्यांना येथे थांबा आहे. या दुर्गंधीयुक्त कचराकुंडीतील माश्या थेट अन्नपदार्थावर बसत असल्याने प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसरातील रहिवाशांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. येथील कचराकुंडी त्वरित हटविण्यात यावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशी संघटनेसह नागरिकांनी केली आहे.