Breaking: नाशिक येथील कार अपघातात तीन जण जखमी तर एक ठार झाल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 00:42 IST2020-01-14T22:14:54+5:302020-01-15T00:42:52+5:30
चालकाला डुलकी लागल्याने वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांगरी गावाजवळ मोटार एका लहान पुलावरून खाली कोसळली.

Breaking: नाशिक येथील कार अपघातात तीन जण जखमी तर एक ठार झाल्याची शक्यता
नाशिक : शिर्डी येथून साईबाबा यांचे दर्शन करून परतताना झालेल्या अपघातात अमृता शृंगारपुरे जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मध्ये एक नातेवाईक ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चालकाला डुलकी लागल्याने वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांगरी गावाजवळ मोटार एका लहान पुलावरून खाली कोसळली. या अपघातात सध्या तरी 3 प्रवासी जखमी झाल्याचे समजते. घटनास्थळी सिन्नर ग्रामीण पोलीस दाखल झाले असून सर्व जखमींना तातडीने नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अमृता यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजले, असे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, अमृता यांचे नातेवाईक अजय विश्वनाथ कारंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतयं. मनिष मिश्रा आणि अमृता या जखमी झाल्या आहेत. नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.