नितेश राणेच्या भाजप उमेदवारीविषयी उद्धव ठाकरेच दसरा मेळाव्यात भूमिका मांडतील : निलम गोऱ्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 04:27 PM2019-10-05T16:27:28+5:302019-10-05T16:35:05+5:30

कणकवलीमधून नितेश राणे यांना भाजपने दिलेल्या उमेदवारीविषयी शिवसेनेची भूमिका काय असेल ते पक्षप्रमुख उदधव ठाकर दसरा मेळाव्यात स्पष्ट करणार असल्याचे शिसेनेच्या उपनेता डॉ.निलम गोऱ्हे यांनी सांगितले. 

Uddhav Thackeray will play a role in Dussehra rally about Nitish Rane's BJP nomination | नितेश राणेच्या भाजप उमेदवारीविषयी उद्धव ठाकरेच दसरा मेळाव्यात भूमिका मांडतील : निलम गोऱ्हे

नितेश राणेच्या भाजप उमेदवारीविषयी उद्धव ठाकरेच दसरा मेळाव्यात भूमिका मांडतील : निलम गोऱ्हे

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेना उपनेता डॉ. निलम गोऱ्हे यांचा नाशिक दौरामोचक्या पदाधिकाऱ्यांकडून घेतला बंंडखोरांचा आढावा

नाशिक : शिवसेनेच्या विरोधाला झुगारून भाजपने कणकवलीमधून  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे यांना दिलेल्या उमेदवारीविषयी शिवसेनेची भूमिका काय असेल ते पक्षप्रमुख उदधव ठाकर दसरा मेळाव्यात स्पष्ट करणार असल्याचे शिसेनेच्या उपनेता डॉ.निलम गोऱ्हे यांनी सांगितले. 
नािशक शहरासह जिल्हातील वेगवेगळ््या मतदार संघांमध्ये शिवसेनेच्या नाराज नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जदाखल करून बंडोखोरी केल्याने पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. या बंडोखोरांचा पक्षाच्या उपनेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये मोचक्या नेत्यांकडून आढावा घेतला. यावेळी पक्षातील बंडोखोरांविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सच्चा शिवसैनिकांना माघार घेण्यास सांगण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेला शहरात अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नसल्या तरी ग्रामीण भागात भाजपच्या तुलनेत अधिक जागा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात शिवसेनेचे ६३ आमदार असताना युतीत १२४ म्हणजे जवळपास दुप्पट जागा शिवसेनेला मिळाल्या असून भाजपचे १२३ आमदार असताना त्यांना केवळ १४६ जागांवर समाधान मानावे लागल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, राज्यभरात युतीच्या नाराज नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने नीलम गोऱ्हे यांनी पक्षातील मोजक्याच नेत्यांची भेट घेऊन चांदवडच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, शहराध्यक्ष सचीन मराठे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंदा दातीर उपस्थित होते. 
आरेच्या वृक्षतोडीला विरोधच
उच्च न्यायालयाचा निर्णयाची प्रत येण्याआधीच सरकारने ज्या पद्धतीने आरेच्या जंगलात वृक्षतोड केली आहे. ती अन्याय कारक  या प्रकरणातील याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्याची संधीही सरकारने दिली नाही. त्यामुळे या प्रकरणाच शिवसेना वृक्षप्रमींसोबतच असून आरेच्या वृक्ष तोडीचा प्रकार हा पाकव्याप्त काश्मीवरी हल्लाप्रमाणेच असल्याचे मत याप्रकरणी शिवसेना युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नोंदविल्याचेही डॉ.निलम गोऱ्हे यांनी यावेळी  अधोरेखीत केले. दरम्यान, आरे वृक्षतोड प्रकरणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर दुटप्पीपणाचा आरोप होत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आरे प्रकरणात पर्यावरण प्रेमाचा बुरखा पांघरून सामाजिक संघटनांच्या नावाखाली शिवसेनेला लक्ष करीत असल्या आरोपही त्यांनी यावेळी केला.    

Web Title: Uddhav Thackeray will play a role in Dussehra rally about Nitish Rane's BJP nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.