श्रमिकनगरमधील प्रकार : व्यावसायिकाच्या घरी सातपूर पोलिसांची कारवाई अडीच लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:24 AM2017-12-18T00:24:31+5:302017-12-18T00:25:24+5:30

राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असताना श्रमिकनगर येथील एका व्यावसायिकाच्या घरी सातपूर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून घरात लपवून ठेवलेला सुमारे अडीच लाखांचा गुटखा ताब्यात घेतला आहे.

Types of Shramik Nagar: Satpur police seized the gutka of 2.5 lakhs for the businessman's house | श्रमिकनगरमधील प्रकार : व्यावसायिकाच्या घरी सातपूर पोलिसांची कारवाई अडीच लाखांचा गुटखा जप्त

श्रमिकनगरमधील प्रकार : व्यावसायिकाच्या घरी सातपूर पोलिसांची कारवाई अडीच लाखांचा गुटखा जप्त

Next
ठळक मुद्देविविध प्रकारच्या गुटख्याची पोती नमुने ताब्यात घेऊन पंचनामा रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची कारवाई

सातपूर : राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असताना श्रमिकनगर येथील एका व्यावसायिकाच्या घरी सातपूर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून घरात लपवून ठेवलेला सुमारे अडीच लाखांचा गुटखा ताब्यात घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची कारवाई सुरू होती.
सातपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल चव्हाण, पोलीस कर्मचारी सागर कुलकर्णी, सुरेश तुपे आदींनी श्रमिकनगर येथील शशिकांत तुंबडू पाटील यांच्या घरी दुपारी तीन वाजेच्या सुमारास छापा मारला असता त्यांच्या घरात विविध प्रकारच्या गुटख्याची पोती आढळून आली. बेकायदेशीर गुटख्याची साठवणूक केल्याचे आढळल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आखाडे यांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त बी. डी. मोरे, विवेक पाटील, गुलाब वसावे यांच्या पथकाने श्रमिकनगरला धाव घेतली. सातपूर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्तिक कारवाई सुरू केली. अन्न व औषध प्रशासनाने नमुने ताब्यात घेऊन पंचनामा सुरू केला. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची कारवाई सुरू होती. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी विवेक पाटील यांनी दिली.
गुप्त माहितीच्या आधारे टाकला छापा
श्रमिकनगर येथील एका किराणा व्यावसायिकाच्या घरी बेकायदेशीर गुटख्याचा साठा लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शशिकांत पाटील यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला असता सुमारे २ लाख ६० हजार रु पये किमतीचा बेकायदेशीर गुटखा (१२ ते १३ पोते) आढळून आला. परंतु याबाबतची कारवाई करण्याचा अधिकार अन्न व औषध प्रशासनाला असल्याने त्यांना माहिती देण्यात आली.

Web Title: Types of Shramik Nagar: Satpur police seized the gutka of 2.5 lakhs for the businessman's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस