दुचाकीच्या अपघातात दोन युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 00:42 IST2022-02-23T00:42:18+5:302022-02-23T00:42:43+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात सकाळच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच ०४ केझेड ८०७८ ही मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असताना, एका ट्रेलरने कट मारल्याने दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, तो रस्त्याच्या संरक्षक भिंतीवर जाऊन धडकल्याने दोघे ठार झाले.

दुचाकीच्या अपघातात दोन युवक ठार
इगतपुरी : मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात सकाळच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच ०४ केझेड ८०७८ ही मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असताना, एका ट्रेलरने कट मारल्याने दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, तो रस्त्याच्या संरक्षक भिंतीवर जाऊन धडकल्याने दोघे ठार झाले. अक्षय खाडे व किरण सोनवणे अशी मृतांची नावे आहेत. कसारा येथून अक्षय खाडे, किरण सोनवणे, वसंत गौर हे तिघे इगतपुरीला येत असताना हा अपघात झाला. अपघातात कसारा येथील अक्षय खाडे, किरण सोनवणे, वसंत गौर हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना समजताच, नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती पाटील गुंड व महामार्ग पोलिसांच्या मदतीने या जखमींना इगतपुरी ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान अक्षय खाडे व किरण सोनवणे यांचा मृत्यू झाला, तर वसंत गौर गंभीर अवस्थेत आहे. या घटनेचा अधिक तपास महामार्गचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.
(२२ इगतपुरी ॲक्सिडेंट)