नांदगावला दोन युवकांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 01:40 AM2019-12-15T01:40:24+5:302019-12-15T01:41:30+5:30

नांदगाव येथील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा शनिवारी (दि. १४) बुडून मृत्यू झाला. किशोर मधुकर चव्हाण व सिद्धार्थ मांगीलाल सोनवणे अशी मृतांची नावे आहेत.

Two youths drowned in Nandgaon | नांदगावला दोन युवकांचा बुडून मृत्यू

नांदगावला दोन युवकांचा बुडून मृत्यू

Next

नांदगाव : येथील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा शनिवारी (दि. १४) बुडून मृत्यू झाला. किशोर मधुकर चव्हाण व सिद्धार्थ मांगीलाल सोनवणे अशी मृतांची नावे आहेत. शुभम व सिद्धार्थ हे मित्र पोहण्यासाठी गेले होते. शुभम पोहून झाल्यावर काठावर आला. सिद्धार्थचा पोहताना दम कोंडला गेल्याचे शुभमच्या लक्षात आले. त्याने पाण्यात उडी मारली. पण दोघेही गटांगळ्या खात असल्याचे तेथे मासेमारीसाठी आलेल्या किशोर चव्हाण याच्या लक्षात
आले.
किशोरने क्षणाचाही विलंब न लावता दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. यावेळी सिद्धार्थने किशोरला मिठी मारली. त्यामुळे हालचाल न करता आल्याने किशोर व सिद्धार्थ बुडाले. सुदैवाने शुभम याचा जीव वाचला.

Web Title: Two youths drowned in Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.