लासलगावी दोन युवकांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:17 IST2018-05-10T00:17:35+5:302018-05-10T00:17:35+5:30
लासलगाव : शेतळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास लासलग येथे घडली.

लासलगावी दोन युवकांचा बुडून मृत्यू
लासलगाव : शेतळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास लासलग येथे घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.राजवाडा भागातील सोमनाथ गणपत शेजवळ यांच्या शेतातील तळ्यात भारत वसंत शिंदे (१९, रा. ब्राह्मणगाव, विंचूर, ता. निफाड) मुजमिल फारूक शेख (१७, रा. मातंगवाडा, निमगाव वाकडा रोड) हे शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांना लासलगाव ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत लासलगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.