शिवजयंतीचा फलक लावताना विजेचा धक्का लागून दोन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 18:06 IST2021-02-19T18:05:45+5:302021-02-19T18:06:47+5:30

वडनेर येथील दुर्घटना, शिवजयंतीवर शोककळा

Two youths die due to electric shock while erecting Shiv Jayanti sign | शिवजयंतीचा फलक लावताना विजेचा धक्का लागून दोन युवकांचा मृत्यू

शिवजयंतीचा फलक लावताना विजेचा धक्का लागून दोन युवकांचा मृत्यू

ठळक मुद्देफलकाच्या वरती असलेल्या विद्युत वाहिनीला लोखंडी पाईपाची चौकट असलेला डिजिटल फलक लागल्याने त्यामध्ये विद्युत प्रवाह उतरून दोघेजण शॉक लागून जागीच मृत्युमुखी पडले.

नाशिक- शहरातील विहितगाव-वडनेर रस्त्यावरील वडनेर गावातील वाळ येथे शिवजयंतीनिमित्त लावलेला डिजिटल फलक आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक खाली पडला. शिवजयंतीचा रस्त्यावर पडलेला फलक उचलून राज मंगेश पाळदे (वय 20 रा. सौभाग्यनगर लॅमरोड) आणि अक्षय किशोर जाधव (वय 26 रा. वडनेर) तसेच इतर दोघे जण पुन्हा उभा करत होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली.  

फलकाच्या वरती असलेल्या विद्युत वाहिनीला लोखंडी पाईपाची चौकट असलेला डिजिटल फलक लागल्याने त्यामध्ये विद्युत प्रवाह उतरून दोघेजण शॉक लागून जागीच मृत्युमुखी पडले. पाळदे व जाधव यांना तातडीने परिसरातील कार्यकर्ते व नागरिकांनी बिटको रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Two youths die due to electric shock while erecting Shiv Jayanti sign