गोंदे शिवारात महामार्गावर दोघे कामगार ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 23:41 IST2019-05-13T23:41:28+5:302019-05-13T23:41:54+5:30

मुंबई नाशिक महामार्गावर गोंदे शिवारात मोटारीच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.

Two workers die on the highway of Gonde Shivar | गोंदे शिवारात महामार्गावर दोघे कामगार ठार

गोंदे शिवारात महामार्गावर दोघे कामगार ठार

नाशिक : मुंबई नाशिक महामार्गावर गोंदे शिवारात मोटारीच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेले माहिती अशी, राकेश यशवंत भंगाळे (38, पाथर्डी फाटा, स्वराज्य नगर), ज्ञानेश्वर शिवाजी महाले (35, रा. वांजोळे गाव) हे दोघे  मित्र दुचाकीवरून नाशिककडे येण्यासाठी निघाले असता गोंदे शिवारात लेयर कंपनिसमोर एका अज्ञात भरधाव मोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत दोघे रस्त्यावर कोसळून गंभीरपणे जखमी झाले. गस्तीवर असलेल्या आरटीओ पथकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी वाडीवरे पोलिसांना माहिती कळविली व रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावून तात्काळ दोघांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून दोघांना मयत घोषित केले.

राकेश, ज्ञानेश्वर हे  गोंदे औद्योगिक वसाहतिमधील डेल्टाफिनोकॅन कंपनीचे   कर्मचारी होते. राकेश यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे तर ज्ञानेश्वर यांच्या पाश्चात्य - आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Web Title: Two workers die on the highway of Gonde Shivar

टॅग्स :Accidentअपघात