Two workers die in factory burns | कारखान्यात भाजल्यामुळे दोन कामगारांचा मृत्यू
कारखान्यात भाजल्यामुळे दोन कामगारांचा मृत्यू

ठळक मुद्देपालखेडची घटना : एक कामगार अत्यवस्थ

दिंडोरी : तालुक्यातील पालखेड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यामध्ये झालेल्या अपघातात भाजल्यामुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला असून, अन्य एकजण अत्यवस्थ आहे.
पालखेड वसाहतीमधील एमआयटीसी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत पहाटे अपघात झाला. यात कामगारांच्या अंगावर भट्टीमधील उकळते लोखंड पडल्याने एकजण जागीच ठार झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात तिसरा कामगारही जखमी झाला असून, तो अत्यवस्थ आहे.
या कंपनीत लोखंड उकळवून त्यापासून सळई बनविण्याचे काम सुरू असताना, भट्टीमधील उकळते लोखंड अंगावर पडल्याने गंभीर भाजलेल्यांपैकी कोमलकुमार भुलैई गौतम (२१) हा जागीच ठार झाला. यामध्ये प्रमोद गुप्तेश्वर पासवाल (३२) व भूपेंद्र लोरिक प्रसाद (२०) हे दोघे गंभीर भाजले होते. यापैकी प्रमोद पासवाल याचा नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. भूपेंद्र प्रसाद अत्यवस्थ असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


Web Title: Two workers die in factory burns
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.