उपनगरला दोन महिलांचे मंगळसूत्र खेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 18:11 IST2018-08-19T18:10:53+5:302018-08-19T18:11:37+5:30

नाशिक : गॅस एजन्सीचे कार्यालय तसेच मेडिकल दुकानातून घरी जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़१८) दुपारच्या सुमारास उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नाशिक-पुणे रोडवरील पुरोहित स्वीटसमोर घडली़

Two women's mangalasutra pulling the suburb | उपनगरला दोन महिलांचे मंगळसूत्र खेचले

उपनगरला दोन महिलांचे मंगळसूत्र खेचले

ठळक मुद्दे७० हजारांचा ऐवज; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : गॅस एजन्सीचे कार्यालय तसेच मेडिकल दुकानातून घरी जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़१८) दुपारच्या सुमारास उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नाशिक-पुणे रोडवरील पुरोहित स्वीटसमोर घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपनगररोड परिसरातील ज्योती विनय मोरे या दुपारी बारा वाजेच्या सुमारास पुरोहित स्वीटसमोरून गॅस एजन्सीच्या कार्यालयात पायी जात होत्या़ यावेळी समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन संशयितांनी मोरे यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़

तर दुसरी घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नारायण बापू चौकाजवळ घडली़ जेलरोडवरील विमलनगरमधील रहिवासी रत्ना रघुनाथ पवार या अष्टविनायक मेडिकल येथून सैलानीबाबा मार्गाकडे जात असताना दुचाकीवरील संशयितांनी पवार यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र खेचून नेले़

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Two women's mangalasutra pulling the suburb