शहरात दोन महिलांचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 01:20 IST2021-11-04T01:19:11+5:302021-11-04T01:20:37+5:30

शहरात विनयभंगाच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. उपनगरांमध्ये नुकत्याच दोन घडना घडल्या असून, त्यातील एका महिलेच्या घरात घुसून तर दुसऱ्या घटनेत ओळखीच्या फेसबुक मित्राने विवाहितेचा विनयभंग केल्याचे पीडितांकडून फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुंबई नाका व इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयितास बेड्या ठोकल्या आहेत.

Two women raped in the city | शहरात दोन महिलांचा विनयभंग

शहरात दोन महिलांचा विनयभंग

नाशिक : शहरात विनयभंगाच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. उपनगरांमध्ये नुकत्याच दोन घडना घडल्या असून, त्यातील एका महिलेच्या घरात घुसून तर दुसऱ्या घटनेत ओळखीच्या फेसबुक मित्राने विवाहितेचा विनयभंग केल्याचे पीडितांकडून फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुंबई नाका व इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयितास बेड्या ठोकल्या आहेत.

सोमवारी (दि. १) सायंकाळच्या सुमारास ती आपल्या घरात झोपलेली असताना संशयित संतोष तुकाराम सोनवणे (४८) याने घरात कुणी नसल्याची संधी साधत उघड्या घरात प्रवेश करून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुला आता सोडणार नाही असे म्हणत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित क्रिष्णा बुलेट ऊर्फ किशोर हा तिचा परिचित असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून इच्छा नसताना वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्लील व अपशब्द वापरून नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये बदनामी केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two women raped in the city