दुचाकीच्या धडकेत महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:06 IST2018-05-11T00:06:56+5:302018-05-11T00:06:56+5:30
त्र्यंबकेश्वर : नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील शिवगंगा लॉन्सजवळ विवाहासाठी आलेल्या फुलाबाई हरिदास वाजे (५५) रा.पांढुर्ली, ता. सिन्नर यांचा दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेने मृत्यू झाला.

दुचाकीच्या धडकेत महिला ठार
त्र्यंबकेश्वर : नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील शिवगंगा लॉन्सजवळ विवाहासाठी आलेल्या फुलाबाई हरिदास वाजे (५५) रा.पांढुर्ली, ता. सिन्नर यांचा दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेने मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वरहून आलेल्या दुचाकी क्र. एमएच ०४-३८५५ ने वाजे यांना धडक दिल्याने त्यांच्या डाव्या पायास, हाताला व छातीला जबर मार लागला. हा अपघात दुपारी झाला. जखमी फुलाबाई यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबतची फिर्याद मयत फुलाबाईचा दीर निवृत्ती रखमाजी वाजे यांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कोरडे अधिक तपास करीत आहेत.