कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:31 IST2018-09-19T00:30:45+5:302018-09-19T00:31:17+5:30
पुणे रोडवरील चिंचोली फाट्यावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ यशवंत वामन जाचक (५८, रा. जाचक मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक : पुणे रोडवरील चिंचोली फाट्यावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ यशवंत वामन जाचक (५८, रा. जाचक मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशवंत जाचक हे मंगळवारी (दि़११) दुपारी एक वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच १५, एफए ७८०४) चिंचोली फाट्याजवळील पुलावर जात होते़ शिवाजी ढाब्याच्या पुढे भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली़ यामध्ये डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते़ उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.