दिंडोरी तालुक्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 18:29 IST2019-12-06T18:28:21+5:302019-12-06T18:29:35+5:30

दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वलखेड फाटा व वरखेडा अशा दोन्ही ठिकाणाहून दुचाकी चोरीस गेल्या आहेत.

Two-wheeler thief in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

दिंडोरी तालुक्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

वणी : तालुक्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वलखेड फाटा व वरखेडा अशा दोन्ही ठिकाणाहून दुचाकी चोरीस गेल्या आहेत. दिंडोरी पोलीस कार्यक्षेत्र असलेल्या वलखेड फाटा येथील सायबर हॉटेल येथे एमएच १५, डीजी ६५३६ ही दुचाकी लावण्यात आली होती. २० हजार रु पये किमतीची दुचाकी अज्ञात याने चोरून नेल्याची फिर्याद विकास यशवंत वसाळ राहणार अवनखेड यांनी दिली. वणी पोलीस कार्यक्षेत्र असलेल्या वरखेडा येथील संजय बंडूलाल बोरा यांची एमएच १५, सीएक्स ४४९१ या क्र मांकाची घरालगत लावलेली २५ हजार रु पये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सध्या दुचाकी चोरटे सक्रि य झालेअसून, ठरावीक कालावधीनंतर दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असून, या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Two-wheeler thief in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.